बारामती - मायक्रोसॉफ्टच्या मदतीने बारामती इनोव्हेशन सिटी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोमवारी (ता. 5) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत या बाबत सविस्तर चर्चा झाली. .नोएडातील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुगलच्या आयटी पार्कच्या धर्तीवर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र व विद्या प्रतिष्ठानच्या पुढाकारातून बारामतीची ओळख इनोव्हेशन सिटी व्हावी, त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व्हावी असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे..विविध विषयांमध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) वापर करुन गतीमान सेवा देण्यासह लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत कशा पध्दतीने होईल, या दृष्टीने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विविध प्रयोग केले जाणार आहेत.सिंगापूर मॉडेलच्या धर्तीवर बारामतीतील शिक्षण, आरोग्य, पाणी, वीजपुरवठा, बांधकाम, शासकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासह अधिकाधिक लोकांकडून ज्या सुविधांचा वापर होतो, त्यात एआय तंत्रज्ञान वापरुन लोकांना त्याचा अधिकचा फायदा कसा होईल, याचा प्रयत्न यात केला जाणार आहे. यात डिजिटलायझेशनचा मोठा भाग असेल..या शिवाय विद्या प्रतिष्ठान एआय सेंटरमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून तेथे गुगल व मायक्रोसॉफ्टच्या मदतीने प्रशिक्षण व संशोधनाचे काम होईल. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिला व शेतकरी यांच्या बाबतीत प्रशिक्षणाचे काम केले जात आहे, त्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न आहे.राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला असून एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता, डिजिटल साक्षरता वाढणार आहे..या बैठकीस बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग सचिव डॉ. अनबलनग पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, मायक्रोसॉफ्टच्या उद्योग संचालक सपना नौहारिया, रतन टाटा कौशल्यविकास विद्यापीठाच्या कुलगुरु अपूर्वा पालकर, कौशल्यविकास आयुक्त नितीन पाटील, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर उपस्थित होते..शरद पवार व प्रतापराव पवार यांचा पुढाकार...एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी व सामान्य माणसांचे जीवन अधिक सुखकारक व्हावे, या साठी ज्येष्ठ नेते शरद पवार व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. आता या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने अजित पवार यांनी राज्य शासनाच्या मदतीने पुढाकार घेतला आहे..मुलांना एआयचे प्रशिक्षण देणार...राज्यातील शालेय शिक्षण, तंत्रनिकेतन व पदवी पदव्युत्तर शिक्षण, कृषी व फार्मसी, आयटीआयच्या मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे शिक्षण देत त्यांच्या ज्ञानात अधिकची भर पडेल व बदलत्या काळानुसार विद्यार्थी तयार होतील, असाही प्रयत्न मायक्रोसॉफ्टच्या मदतीने राज्य शासनाकडून होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.