Chh. Shivaji Maharaj Statue : उपमुख्यमंत्री पवार करणार माळेगावात शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण

Sugar Industry : माळेगाव साखर कारखान्यातील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. उद्या (ता. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण सोहळा होणार असून, त्यानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Chh. Shivaji Maharaj Statue
Chh. Shivaji Maharaj StatueSakal
Updated on

माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील महत्वकांक्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे नुतनिकरण पुर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार (ता.२८) रोजी सदर पुताळ्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आनावर सोहळा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com