पुणे : मध्य भागातील दुकाने उघडण्याबाबत अजित पवार यांनी दिला 'हा' आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

सोमवारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. 

पुणे : शहराच्या मध्यभागातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, या पुणे व्यापारी महासंघाच्या मागणीवर निर्णय घेण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यानुसार सोमवारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, भवानी, रास्ता, गणेश, नाना पेठ आणि येरवडा भागातील दुकाने बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आणि पोलिसांनी दिला आहे. त्या बाबत महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया, अतुल अष्टेकर, विपुल अष्टेकर यांनी विधानभवनात पवार यांची शनिवारी भेट घेतली. त्यावेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, महापलिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच विशेष अधिकारी सौरभ राव उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्रात ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत, तो परिसर सील करावा, अन्यत्र व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महासंघातर्फे करण्यात आली. त्यावर पवार यांनी दुकाने बंद ठेवण्यास कोणी सांगितले, अशी विचारणा केली. पोलिसांनी दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे, असे अधिकाऱयांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पवार यांनी याबाबत सोमवारी बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्या, असे आदेश सौरभ राव यांना दिले. त्या बैठकीस पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी बोलविण्यास त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत रांका म्हणाले, ज्या ठिकाणी रुग्ण आहेत, तेथे दुकाने उघडण्याची आम्ही परवानगी मागितलेली नाही. परंतु, ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तेथील दुकाने उघडण्यास परवानगी द्या. कोणताही भाग सरसकट सील करणे योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे. नागरिक आणि व्यापाऱयांची सुरक्षितता जोपासून या बाबत निर्णय घेतला गेला पाहिजे, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना आम्ही केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी याबाबत होणाऱ्या बैठकीत मध्य पुण्यातील दुकाने उघडण्याबाबत आता निर्णय होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Took Decision about Shops Open Soon in Pune