उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला टेनिस खेळण्याचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ajit Pawar took pleasure playing tennis at Inauguration of state level competition Baramati Lawn Tennis Club

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला टेनिस खेळण्याचा आनंद

बारामती : सकाळची प्रसन्न वेळ, दिवसाचा पहिलाच कार्यक्रम, तोही लॉन टेनिस स्पर्धांच्या उदघाटनाचा...अशा वेळेस स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही काळ हातात रॅकेट घेत टेनिसचा आनंद घेतला. बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन, जिल्हा क्रीडा संकुल व बारामती लॉन टेनिस क्लब यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सस्पर्धेचे उदघाटन शनिवारी (ता. 7) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी काही वेळ रॅकेट घेत टेनिसचा आनंद लुटला.

या प्रसंगी दहा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेचे उदघाटन पवार यांनी केले. यावेळी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुंदर अय्यर, प्रवीण मसाले कंपनीचे कार्यकारी संचालक राजेंद्र चोरडिया, राजू देसाई, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कासगावडे, क्रीडा अधिकारी महेश धावले, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य अविनाश लगड, सचिव दत्तात्रय बोराडे, खजिनदार धैर्यशील तावरे, डॉ. अविनाश आटोळे, डॉ. अविनाश जगताप, डॉ. राजेश कोकरे, डॉ. राजेंद्र पोवार, सलिल कुंचुर, डॉ. प्रदीप कुंचुर, डॉ. दादासाहेब वायसे, डॉ. अमोल भंडारे, मंगेश खंडागळे, जगन्नाथ सुरवसे, जालिंदर बालगुडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 42 मुले व 35 मुली सहभागी झाले आहेत. पर्यवेक्षक तेजस कुलकर्णी यांच्या परिक्षणाखाली या स्पर्धा पार पडत आहे.

Web Title: Ajit Pawar Took Pleasure Playing Tennis At Inauguration Of State Level Competition Baramati Lawn Tennis Club

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top