Baramati News : बारामतीसाठी अजूनही खूप काही करायचे आहे : अजित पवार
Ajit Pawar : बारामतीतील तीन हत्ती चौकात उभारलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.
बारामती : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व केले जाईल, बारामतीसाठी अजूनही भरपूर विकास कामे करायची आहेत, यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.