
पुणे : ‘‘पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या भागातून जाणाऱ्या नाशिक फाटा ते खेड (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०), हडपसर ते यवत (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५) तसेच तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी) यांचे तातडीने रुंदीकरण करावे,’’ अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.