Ajit Pawar : "हे तीन पक्षांचे सरकार आहे"; दौंडच्या सभेत अजित पवारांचा पोलिसांना इशारा!

Daund Election : दौंड येथील सभेत अजित पवारांनी पोलिसांना कडक इशारा देत दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत त्यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर उघडे आव्हान दिले.
Ajit Pawar Warns Police to Maintain Law and Order in Daund

Ajit Pawar Warns Police to Maintain Law and Order in Daund

Sakal

Updated on

दौंड : दौंड मध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. मला पोलिस खात्याला सांगायचं आहे, हे तीन पक्षांचे सरकार आहे. तशा पध्दतीने जर कोणी त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर निवडणूक होईल - जाईल, परंतु नंतर आपण सगळे इथेच आहोत. ज्यांची कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवायची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, असा गर्भित इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com