...म्हणून अजित पवार करणार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- अजित पवार करणार इच्छुकांशी चर्चा

- झेडपी, पंचायत समिती पदाधिकारी निवड

पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या पदाधिकारी निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उद्या (शनिवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष आणि आजी- माजी आमदारांशी चर्चा करणार आहेत. यासाठी पवार यांनी उद्या (शनिवारी) दुपारी पुण्यात खास बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही भावी पदाधिकार्यांची नावे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हेही मार्गदर्शन करणार आहेत.

आणखी वाचा - आता मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar will discuss with NCP Office bearer about ZP Officials Selections