शिवसेनेसमोर भाजपचे नेते आता पायघड्या घालतील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - मुंबई आणि दिल्लीतील सत्ता ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेला न जुमानणारे भाजपचे नेते आता शिवसेनेसमोर पायघड्या घालतील. आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याची भाषाही करतील. पण, ही मंडळी युती करून लढतील. अन्यथा भाजप विरोधी बाकांवर असेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपला डिवचले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगीतून उठून फुफाट्यात पडणार नाहीत, असे सांगत ठाकरेही भाजपला सोडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

भंडारा-गोंदियामधील निवडणुकीत यश मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपली भूमिका मांडली. निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवारांची पळवापळवी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

ते म्हणाले, ""राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना करीत आहे. मात्र, युती न झाल्यास सत्ता गमवावी लागणार असल्याचे भाजप नेत्यांना कळाले आहे. त्यातून या पक्षाचे निर्णय घेणारे नेते युती करण्याबाबत सकारात्मक भूमिकेच्या मनःस्थितीत आहे. प्रसंगी शिवसेनेला अधिक जागा देतील. पालघरमध्ये मतांची विभागणी झाल्यानेच भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. या निकालानिमित्त समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची सूचना तेथील मतदारांनी केली आहे.'' 

भुजबळ दुसरीकडे जाणार नाहीत 
पवार म्हणाले, ""राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अन्य पक्षात जाणार नाहीत. ते पुण्यातील पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. माजी खासदार नाना पटोले यांच्या उमेदवारीबाबत कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी समजूत काढली होती. पटोले आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. या निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा संपला आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar's criticism on bjp