Ajit Pawar
sakal
पुणे : ‘‘मित्र पक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाहीत, किंवा माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असे ठरले होते परंतु ते घेतले गेले आहेत,’’ अशी नाराजी व्यक्त करीत ‘कोणी सुरुवात केली, तर समोरचाही सुरुवात करतो,’’ असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी केले. आघाडीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले असल्याचे सांगून पवार यांनी युती- आघाडीबाबतचा संभ्रम कायम ठेवला.