
Ajit Pawar
Sakal
पुणे : ‘‘राज्यात सध्या जाती-धर्मांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, धर्मावरचे राजकारण काही दिवस चालेल. मात्र, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा आणि अठरापगड जातींना सोबत घेऊनच भविष्यात पुढे जावे लागेल. त्यादृष्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल,’’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.