esakal | अजितदादांचा सल्ला, कोरोना रुग्णालयात जेवण चांगल्या प्रतीचे द्या
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

कोरोना रुग्णालयात रुग्णांना देण्यात येत असलेले जेवण हे चांगल्या प्रतीचे असावे. गंभीर रुग्णांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

अजितदादांचा सल्ला, कोरोना रुग्णालयात जेवण चांगल्या प्रतीचे द्या

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून कोरोना प्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णालयात रुग्णांना देण्यात येत असलेले जेवण हे चांगल्या प्रतीचे असावे. गंभीर रुग्णांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

पुण्यात आज पावसाचा इशारा

कोरोनाबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरासह तालुक्यात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोनाबाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

पुरंदर विमानतळाच्या निर्णयाच्या टेकआॅफविनाच बैठक
 
दरम्यान, आमदार स्थानिक विकास निधीतून बारामती तालुक्यातील आशा सेविकांसाठी 10 लाख रुपयांचे पल्स ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनर आणि मुंबईतील उद्योजक आशिष पोतदार यांच्याकडून दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या अर्सेनिक गोळ्या बारामतीतील 1 लाख कुटुंबासाठी अजित पवार यांनी प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. तसेच, कोविड निधीतून खरेदी करण्यात आलेली रुग्णवाहिका अजित पवार यांनी रुई ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मार्ट पोलिसिंग उपक्रमांतर्गत बारामती तालुका पोलिस स्टेशन आणि बारामती शहर पोलिस स्टेशन यांना स्मार्ट पोलिसिंग आयएसओ 9001-2015 प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल ग्रामीण पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आणि बारामती शहर पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलीस अधिाकरी नारायण शिरगावकर उपस्थित होते.