
माळेगाव : बारामतीचा सर्वांगिण विकास राज्याला नवा संदेश देणार आहे. शिक्षण,आरोग्य,पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या व्यवस्थेसह मूलभूत गरजा येथे पुर्णत्वाला येत आहेत. नीरा नदीकाठच्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी चाऱ्या स्वच्छतेचा महत्वकांक्षी प्रकल्प पाटबंधारे संशोधन व जलनिःसारण विभागाने राबवविला आहे. नदी प्रदूषणाचा बंदोबस्त करण्यासाठी माळेगावने २० लाख लिटर क्षेमतेचा ईटीपी प्रकल्प व ६ लाख लिटर क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारला. परंतु कारखाना विस्तारिकणामुळे हा प्रकल्प पुरेसे ठरत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा येथे शासनस्तरावर ८ कोटी रुपयांचे दोन एसटीपी प्रकल्प मंजूर केले. असे असताना प्रदूषण मुद्यांवर अजितदादांना बदनाम करणे विरोधकांना शोभत का, असा सवाल माळेगावचे संचालक नितीन सातव यांनी केला.