Amit Shaha : अजित पवारांची कार्यपद्धती नव्या पिढीसाठी विद्यापीठ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण

पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शहा बोलत होते.
Amit Shah

Amit Shah

sakal

Updated on: 

पुणे - ‘अजित पवार हे काम करणारे आणि कामाचे माणूस होते. लोकांच्या प्रश्नांसाठी पहाटे सात वाजताच मंत्रालयात उपस्थित राहणारा, प्रश्न समजून घेऊन काही तासांत त्यावर कार्यवाही करणारा नेता अकाली आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांप्रती संवेदनशीलता, कामाची शिस्त, नियोजन आणि निर्णयांची अंमलबजावणी ही त्यांनी विकसित केलेली कार्यपद्धती महाराष्ट्रातील नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्त्यांसाठी विद्यापीठ ठरेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केले.

Loading content, please wait...