Ajit Pawar: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू!

Ajit Pawar: 1990 नंतर धरण व कालव्यांच्या कामाला गती दिली त्याचबरोबर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले त्यामुळे हा परिसर सुजलम व हिरवागार झाला आहे.
ajit pawar milk news
ajit pawar milk newssakal

Pune News Ajit Pawar: राज्यातील दुध उतपादक शेतकर्यांना ५ रुपये अनुदय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माझा प्रयत्न सुरु आहे. पण झारीतील शुक्राचार्य दूर करून योग्य निर्णय घेऊन दुध अनुदानचा प्रश्न लवकरच महायुतीचे सरकार मार्गी लावील अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ajit pawar milk news
Ajit Pawar meets Anand Adsul: दादा-अडसुळांच्या गुफ्तगूमुळे चर्चांना उधाण, तपशील उघड करण्यास मात्र नकार; सस्पेन्स वाढला

मंचर (ता.आंबेगाव) येथे ...४३३.. कोटीं रुपयांचीविकास कामे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, देवेंद्र शहा, किरण वळसे पाटील, पोपटराव गावडे, विलासराव लांडे, भगवान पासलकर,पांडुरंग पवार, मानसिंग पाचुदकर, प्रकाश पवार, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, वसंतराव भालेराव, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, शिवाजीराव ढोबळे, स्वप्निल ढमढेरे. सविता बगाटे,सचिन पानसरे,निलेश थोरात, सुषमा शिंदे . अरुणा थोरात, संतोष भोर ,दिनेश खेडकर, गोविंद खिल्लारीउपसस्थित होते.

पवार म्हणाले, “आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील जनता भाग्यवान आहे. जनतेशी नाळ जोडणारा प्रतिनिधी म्हणून वळसे पाटील यांना सलग सात वेळा तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. एकेकाळी दुष्काळी आंबेगाव तालुका म्हणून ओळखला जात होता. १९६८ मध्ये विधिमंडळात तत्कालीन आमदार (स्व). दत्तात्रय वळसे पाटील यांनी डिंभे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.

धरणाचे काम काही प्रमाणात झाले होते पण उजव्या कालव्याला निधीच नव्हता दिलीप वळसे पाटील यांनी 1990 नंतर धरण व कालव्यांच्या कामाला गती दिली त्याचबरोबर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले त्यामुळे हा परिसर सुजलम व हिरवागार झाला आहे.

ajit pawar milk news
Ajit Pawar : घोडगंगा कारखाना फक्त आम्ही सुरु करू शकतो

तुमचे हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर त्यासाठी वळसे पाटील यांना तुम्ही ज्याप्रमाणे साथ देणार त्याप्रमाणेच मी तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहील. वळसे पाटील यांनी 653 कामांसाठी 1157 कोटी रुपयाचा निधी मतदार संघात आणला आहे. हे त्यांचे कर्तुत्व आहे. भीमाशंकर कारखाना हा देशातील एक नावलौकिक प्राप्त केलेला कारखाना आहे

. शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन तसेच आज उद्घाटन केलेले कवयित्री व शांताबाई शेळके अत्याधुनिक वातानुकूलित नाट्यगृह पाहून मला आनंद झाला या तालुक्यात शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहरा बरोबरच बारामती व त्यानंतर आंबेगाव चा उल्लेख मला करावा लागेल. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी आमदार बेनके यांनी केलेल्या मागणी विषयी आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.

त्यासाठी सौर ऊर्जेचे प्रकल्प प्राधान्याने या भागात उभे केले जातील. नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरील वाहतूकुंडीचा प्रश्न दूर होण्यासाठी आठ पदरी पूल काम झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी दूर होईल. सत्ते शिवाय विकास कामे होत नाहीत. राज्यात व देशात एक सरकार असल्यामुळे विकास कामांना गती येते. आगामी लोकसभा निवडणुकीतही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीलमहायुतीच्या उमेदवाराला साथ द्यावी. येथील जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे.

ajit pawar milk news
Ajit Pawar : सेलिब्रिटींना राजकारणात का आणलं जातं? अमोल कोल्हेंबद्दल अजित पवार रोखठोक बोलले

फुले आंबेडकर, यांचे विचार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच आम्ही वाटचाल करत आहोत. विनाकारण आमच्याबद्दल अपप्रचार करू नये. आम्ही बोलतो तेच करतो बोल घेवड्या पणा कधीही केला नाही व करणार नाही.\

कुणाची उनी धुनी काढायचे नाहीत. फक्त चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करायचा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही पडले ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेतकरी व परिसर विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सूत्रसंचालन निलेश थोरात यांनी केले.

सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. शिरूर तालुक्याचे 39 गावातून व आंबेगावच्या आदिवासी भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेतकरी आले होते.पराग शुगर कंपनीच्या वतीने उसाची सहा गुऱ्हाळेउभी केली होती. सर्व उपस्थित त्यांना मोफत रस वाटप केले जात होते

ajit pawar milk news
Ajit Pawar in Namo Rojgar Melava : पूर्वीची बारामती अन् आज.. शरद पवारांच्या समोरच अजित पवारांनी मोजली विकासकामे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com