Ajit Pawar : सेलिब्रिटींना राजकारणात का आणलं जातं? अमोल कोल्हेंबद्दल अजित पवार रोखठोक बोलले

Ajit Pawar on Amol Kolhe : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सेलिब्रिटी लोकांना आम्ही राजकारणात का आणतो? याबद्दल अजित पवारांनी खुलासा केला.
Ajit Pawar on amol kolhe
Ajit Pawar on amol kolheesakal
Updated on

Ajit Pawar on Amol Kolhe : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सेलिब्रिटी लोकांना आम्ही राजकारणात का आणतो? याबद्दल अजित पवारांनी खुलासा केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही नेमकं वेगळं (शरद पवारांपासून) का झालो, याबद्दल अजूनही लोकांच्या मनात शंका आहे. पण तुम्ही मनात वेगळं काही आणू नका.. आपण इकडं आहोत ते तिकडं आहेत.

''मीच तुमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा, अशी विनंती करायला यायचो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातून घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षप्रवेश देत तिकीट दिलं होतं. मी आणि दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी घेतली होती. माझ्यावर भोसरी, शिरुर आणि हडपसरची जबाबदारी होती. आपण हे सीट निवडून आणलं होतं. मला वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंडा आहे. चांगलं काम करील..''

Ajit Pawar on amol kolhe
Awhad Letter to Prakash Ambedkar: "तर तुम्हाला पुढची पिढी..."; आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना लिहिलं खुलं पत्र

अजित पवार पुढे बोलले की, नंतर दोन वर्षे झाली की ते (अमोल कोल्हे) म्हणाले-दादा मला राजीनामा द्यायचाय. मी म्हटलो, जनतेने पाचवर्षांसाठी निवडून दिलं आणि दोनच वर्षात राजीनामा कसा द्यायचा? लोक जोड्याने मारतील. त्यावर ते (अमोल कोल्हे) म्हणाले, मी कलावंत आहे, माझी नाटकं, चित्रपट, व्यवसाय यावर परिणाम होतो. मी सेलिब्रिटी आहे लोकांना वाटतं रोज मतदारसंघात यावं. पण माझी कामं असतात, यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

Ajit Pawar on amol kolhe
Ranji Trophy 2024 Mumbai : लॉर्ड शार्दुलचा शतकी तडाखा अन् तमिळनाडूचा डावाने पराभव, मुंबई पोहचली 42 व्या विजेतेपदाच्या वेशीवर

''असे त्यांचे शब्द होते. पण मी म्हटलो, तसं करु नका खराब दिसेल. कसंबसं करत त्यावेळी त्यांना समजावलं होतं. खरंतर त्यांचा राजकाराणाचा पिंडच नाही. एखादा उमेदवार पराभूत करता येत नसेल तर आम्ही राजकीय लोक सेलिब्रिटींना उमेदवारी देत असतो. यात आमच्याही चुका आहे. या लोकांना राजकीय जाण आहे का, विकास कळतो का.. हे बघितलं पाहिजे.'' असं म्हणत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com