

Baramati News
sakal
माळेगाव : बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायतीच्या विकासामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली या संस्थांनी सातत्याने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली. त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक व्हावी, या उद्देशाने बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे आज नामांतर करण्यात आले. याशिवाय माळेगाव सहकारी साखर कारखान्याचेही नामांतर करण्याबाबत संचालक मंडळाची चर्चा सुरू आहे, अशी माहिती संचालक योगेश जगताप यांनी दिली.