esakal | Video : कोरोना'च्या चक्रव्यूहात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रोजेक्ट करुणा'
sakal

बोलून बातमी शोधा

Akanksha Foundation schools launch Project Karuna to help parents of students in distress due to corona

पुणे महापालिकेच्या सावित्रीबाई फुले इंग्रजी शाळा, भवानी पेठ (दोन शाळा), आचार्य विनोबा भावे माध्यमिक इंग्रजी शाळा, गंज पेठ, के.सी. ठाकरे विद्यानिकेतन शाळा, सोमवार पेठ या चार शाळा "अक्षांशा फाऊंडेशन''च्या माध्यमातून चालविल्या जातात. शाळा आणि पालकांचा हा हृदयस्पर्शी प्रवास 'सकाळ'ने उलगडून समोर आणला आहे. 

Video : कोरोना'च्या चक्रव्यूहात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रोजेक्ट करुणा'

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना'च्या संकटाने गंज पेठ, भवानी पेठे, सोमवार पेठेतील दाट झोपडपट्टी, लहान घरे यामुळे या परिसराला 'कोरोना'ने इतके भयंकर घेरले आहे की, अनेकांच्या घरात रुग्ण होते. आर्थिक, सामाजिक, मानसिक संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना मदत करण्यासाठी "आकांक्षा फाऊंडेशन"च्या शाळांनी 'प्रोजेक्ट करूणा' सुरू केला. शाळेतील शिक्षकांनी भेदरलेल्या मुलांशी आपुलकीने चौकशी करत त्यांना मायेची उब दिली. पालकांची आर्थिक स्थिती समजावून घेत थेट मदत केली. सतत दोन महिने शाळेचे शिक्षक, मदतनीस, समाजसेवकांनी जीव धोक्यात घालून नवे ऋणानुबंध निर्माण केले. 

- राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आमदारांनी काय सल्ला दिला? वाचा सविस्तर!

पुणे महापालिकेच्या सावित्रीबाई फुले इंग्रजी शाळा, भवानी पेठ (दोन शाळा), आचार्य विनोबा भावे माध्यमिक इंग्रजी शाळा, गंज पेठ, के.सी. ठाकरे विद्यानिकेतन शाळा, सोमवार पेठ या चार शाळा "अक्षांशा फाऊंडेशन''च्या माध्यमातून चालविल्या जातात. शाळा आणि पालकांचा हा हृदयस्पर्शी प्रवास 'सकाळ'ने उलगडून समोर आणला आहे. 

- ४९ वर्षांच्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवत घातला लाखोंचा गंडा; काय आहे हे प्रकरण?

 "लाॅकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसात आम्हाला लवकर सर्व सुरळीत होईल असे वाटले, पण आमच्या शाळा ज्या भागात आहेत, तेथे रुग्णसंख्या जास्त झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे आम्हालही चिंता वाटू लागली, असे सांगत आचार्य विनोबा भावे शाळेच्या प्रमुख चिन्मया पोतनीस म्हणाल्या, "अनेक पालकांचा रोजगार बंद झाला आहे, पैसे व घरातील किराणा संपत आला आहे. मुलेही घाबरून गेले होती, छोट्या घरात सर्वजण रहात असल्याने स्थिती अवघड असल्याचे पालकांशी संपर्क केल्यावर कळाले. यानंतर शाळेतील शिक्षकांनी आपापल्या वर्गातील मुलांशी रोज संपर्क करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना विविध उपक्रमात गुंतवून ठेवा अशी सूचना दिल्या. त्याच वेळी शाळेत समाज सेवक व मदतनीस म्हणून काम करणारे दादा ताई, थेट वस्तीत जाऊन किराणा सामान पोहोचविण्याच्या कामात लागले. हा सर्व काळ आमच्यासाठी खुप आव्हानात्मक होता. पण मुलांना भावनीक आधार देऊन सकारात्मक विचारांसाठी प्रवृत्त केले. "

- पुणेकर खवय्यांसाठी 'थोडी खुशी थोडा गम'; वाचा महत्त्वाची बातमी

थेट वस्तीत जाऊन मदत करणारे समाजसेवक संतोष शिंदे म्हणाले, "भवानी पेठ, गंज पेठ, नाना पेठेचा भाग सील केल्याने आम्हाला मदत करण्यात अनेक अडचणी आल्या. येथे बाहेरून एकही वस्तू आत येऊ शकत नव्हती, पण वस्तीत किती हाल होत आहेत हे स्थानिक पोलिसांना स्थिती माहिती होते, म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केले. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांद्वारे सुमारे ८५१ पालकांना धान्यकीट व इतर मदत थेट मदत पोहचू शकलो. रोजगार बुडाल्याने व मुलांच्या काळजीने पालकही चिंतातूर होते. यातून त्यांना बाहेर काढणे हे आमच्या समोर आव्हान होते."

अन आईच निघाली पाॅजिटीव्ह 
आनंद अशोक अंकुश यांची मुलगा आणि मुलगी सावित्रीबाई फुले शाळेत आहेत, आनंद हे शालेय व्यवस्थापन समितीवर कार्यरत आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या अॅटोतून घरोघरी मदत पोहोचवली, त्यातच त्यांच्या आईला कोरोना झाल्याने घरातील सर्वजण क्वारंटाईन झाले. पण १४ दिवसांनी ते पुन्हा कामाला लागले
 आनंद म्हणाले, "वस्तीतील सर्वांचे हातावरचे पोट आहे, त्यामुळे धोका पत्कारून मदत करणे गरजेचे होते. माझ्या प्रमाणे या कामात अन्य पालकही सहभागी होते. त्यामुळे ही मदत करणे शक्य झाले."
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दोन विद्यार्थांना कोरोना
पोतनीस म्हणाल्या, " आमच्या दोन विद्यार्थांना कोरोना झाला होता, त्यावेळीही आम्ही रोज संपर्कात होतो, मुले आमच्याशी ते कुठे आहेत, कसे आहेत, काय वाटत हे सांगायचे. त्यांना ही आधार वाटत होता. एका विद्यार्थांनीच्या घरातील सर्वांना कोरोना झाला, त्यावेळी तिलाही शाळेने आपुलीने आधार दिला. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळा यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चार शाळांमधील विद्यार्थी संख्या - १७९७ 

शिक्षक संख्या - ८८ 
समाजसेवक - ४ 
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य - ५५
पालकांना केलेले किट वापट - ८५१
पुण्यात इतर केलेले किट वापट -२८००

बुलेट
- कुटुंबासोबत आनंदी क्षण  जगण्याचे आवाहन
- घरात बसून वेगवेगळे खेळ खेळला
- चित्र काढा, नवीन वाद्य शिका, खाद्यपदार्थ बनवा, छंद जोपण्याचे आवाहन
- आज काय केले हे फोनवरून चौकशी, कधी कधी व्हीव्डीओ काॅलद्वारे चर्चा, तर कधी सर्व मुलांचा कॉन्फरन्स काॅल
- शाळा सुरू झाल्यावरही केले जाणार समुपदेशन

loading image
go to top