मायावती अखिलेश टीका

मायावती अखिलेश टीका
Published on

अखिलेश यादव यांचे मौन
परिस्थिती चिघळवणारे

मायावतींची टीका : राजकुमार भाटींचे ब्राह्मणांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

लखनौ, ता. १५ (पीटीआय) : समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजकुमार भाटी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी शुक्रवारी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणी अखिलेश यादव यांनी बाळगलेले मौन परिस्थिती अधिक चिघळवत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

मायावती यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली. त्यांनी नमूद केले, ‘समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या अशोभनीय आणि आक्षेपार्ह विधानाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, जातीपातीचे राजकारण करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाचे या विषयावरील मौन परिस्थिती अधिक चिघळवत आहे. यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.’

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते भाटी यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाच्या सन्मानाला धक्का बसला आहे. याची दखल घेऊन अखिलेश यादव यांनी तातडीने ब्राह्मण समाजाची माफी मागावी आणि दिलगिरी व्यक्त करावी, असेही मायावती यांनी सुचवले आहे. समाजवादी पक्षाचा दलित, अतिमागास आणि मुस्लिम समाजाप्रमाणेच ब्राह्मण समाजाप्रती असलेला द्वेषपूर्ण दृष्टिकोन बदललेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली. मायावती यांनी नमूद केले, की बसपने नेहमीच सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले आहे. आमच्या पक्षात आणि सरकारमध्ये ब्राह्मण समाजाला नेहमीच सन्मानाचे स्थान आणि योग्य प्रतिनिधित्व दिले गेले आहे. बसपा ‘वापरा आणि फेकून द्या’ या धोरणावर विश्वास ठेवत नाही.
-------------

भाटी यांच्याविरुद्ध गुन्हा

दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनी राजकुमार भाटी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात भाटी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार भाजप नेते अजय शर्मा यांनी केली होती. या वक्तव्याचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाल्यानंतर भाटी यांनी माफी मागितली असून, आपल्या भाषणाचा काही भाग चुकीच्या पद्धतीने पसरवला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी नॉयडा येथेही भाटी यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com