अकलूजमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

अकलूजमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार
Published on

अकलूजमध्ये शनिवारी बैलगाडा शर्यतीचा थरार
..........
अकलूज ता. ११ : श्री. विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने शनिवारी (ता. १४) आनंदनगर येथे बैलगाडा शर्यत होणार असून बैलगाडा मालकांनी शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ६ पर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती संयोजक मदनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलू-चाकोरे रोडवरील शिवकीर्ती शेती फार्म आनंदनगर येथील २५ ते ३० एकर क्षेत्रावर आयोजित बैलगाडा शर्यतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मोहिते-पाटील बोलत होते‌. यावेळी सचिव राजेंद्र काकडे, विश्वस्त चंद्रकांत कुंभार, श्रीकांत राऊत, लक्ष्मण पवार, देविदास ढोपे, भीमराव काळे, गणेश काळे, लखन चव्हाण, संतोष शिंदे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
श्री मोहिते पाटील पुढे म्हणाले, स्पर्धा महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार असून स्पर्धा सुरवात ते अंतिम रेषेपर्यंत चित्रीकरण करण्यात येणार तर तज्ञ व पदसिद्ध पंच नियुक्तीने निःपक्षपाती निकाल मिळण्यास मदत होणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी सुरक्षेतेसाठी बॅरिगेटिंग, सर्वांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका आधी सुविधा उपलब्ध केल्या असल्याचेही मोहिते-पाटील यांनी सांगितले.

बक्षिसे
प्रथम क्रमांकाच्या बैलगाड्यास १ लाख ५० हजार व चषक, व्दितीय क्रमांक १ लाख १० हजार व चषक, तृतीय रुपये. ७१ हजार व चषक, चतुर्थ रुपये. ६१ हजार व चषक, पाचवा रुपये. ५१ हजार व चषक, सहावा रुपये. ३१ हजार व चषक, सातवा रुपये. २१ हजार व चषक, आठवा रुपये. ११ हजार व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या बैलगाडा मालकास रोख बक्षीस व चषक तर त्यांच्या बैल जोडीस आकर्षक झूल बाशिंग वगैरे देऊन गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com