महासाधना सप्ताहात अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय बहुमान

महासाधना सप्ताहात अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय बहुमान
Published on

महासाधना सप्ताहात अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय बहुमान

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘महासाधना सप्ताह’ उपक्रमात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मंत्रालयात पार पडलेल्या सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम (भा.प्र.से.) यांना सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
२ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘महासाधना सप्ताह’ अंतर्गत iGOT प्रशिक्षण, कर्मचारी नोंदणी, डिजिटल प्रशासन, प्रशिक्षणातील सक्रिय सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणी या विविध निकषांमध्ये अकोला जिल्हा परिषद राज्यात ठळकपणे उठून दिसली. प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे जिल्हा परिषदेला हा मानाचा सन्मान मिळाला.
या गौरव सोहळ्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच अति मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील निवडक जिल्हा परिषदांमध्ये अकोला जिल्हा परिषदेचा समावेश झाल्याने हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला.


प्रतिक्रिया....
“हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा नसून अकोला जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक मेहनतीचा आणि समर्पणाचा सन्मान आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आणि त्यांच्या टीमने अत्यंत नियोजनबद्ध व प्रभावीपणे काम करून हा उपक्रम यशस्वी केला.”
--अनिता मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com