

Indian Scientists Discover Alaknanda Galaxy
Sakal
पुणे : महास्फोटानंतर १.५ अब्ज वर्षांनी पूर्णत: विकसित झालेली, आपल्यापासून १२ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेली अन् आपल्याच आकाशगंगेसारखी दिसणारी नवीन ‘अलकनंदा’ ही दीर्घिका भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधली आहे. ‘नासा’च्या जेम्स वेब टेलिस्कोपचा वापर करून या खगोलशास्त्रज्ञांनी सर्वांत दूरच्या सर्पिल दीर्घिकांपैकी एक असणारी ही नवीन दीर्घिका शोधून काढली आहे.