alandi winners academy seal
sakal
आळंदी - दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने शहरातील विनर्स अकॅडमी कोचिंग क्लासेस आस्थापनांची पाहणी केल्यानंतर ती परवानगीविना सुरू असल्याचे निदर्शनास आले. नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना, ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून दिसून आले नाही. परिणामी आज मिळकत सील करण्याची कारवाई नगरपरिषदेच्या कर संकलन विभागाकडून करण्यात आली.