Alandi Crime Case : प्रोटीन सप्लीमेंटच्या दुकानातील वादातून जीम ट्रेनर तरुणीने आपल्या साथीदाराच्या मदतीने लोखंडी गजाने मारहाण करून वडमुखवाडीतील ३५ वर्षीय तरुणाचा खून केला. ही घटना आळंदी नगर परिषद हद्दीतील काळे कॉलनीत असलेल्या ‘प्रोटीन पझल’ दुकानात बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी सुमारे पावणेतीनच्या सुमारास घडली.