

Alandi Rathotsav Ceremony Concluded
Sakal
आळंदी : लाकडी रथात माउलींचा चांदीचा मुखवटा ठेवून सजवलेले रूप डोळ्यात साठवीत खांद्यावर भगव्या पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी माउली नामाचा अखंड गजर केला. वारकऱ्यांनी गोपाळपुरा येथून लाकडी रथ हाताने ओढत नगरप्रदक्षिणेसाठी पुढे नेला. द्वादशीनिमित्त काढलेल्या रथोत्सवाचे दर्शन घेत भाविकांनी हा सोहळा डोळ्यात साठविला.