Alandi Ganesh Festival : आळंदी नगर परिषदेची पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम हौदांची व्यवस्था, गणेश विसर्जनासाठी नवा उपक्रम
Eco Friendly Ganpati : आळंदी नगरपरिषदेकडून इंद्रायणी नदीचे संरक्षण करण्यासाठी पाच मूर्ती संकलन केंद्र व कृत्रिम हौदांची व्यवस्था करून पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
आळंदी : पर्यावरण पूरक गणेश उत्सव आणि नदीतील जलप्रदूषण टाळण्यासाठी नगर परिषदेने आळंदी शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जनासाठी पाच कृत्रिम हौद तयार ठेवले आहेत.