
आळंदी : राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आळंदी येथील मावळी भागात तसेच देहू परिसरात पावसाची संततधार कोसळत आहे. यामुळे आळंदीतील इँद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच मागील आठवड्यात सांडपाण्यामुळे इंद्रायणीमधील पाण्याचा रंग काळपट झाला होता. मात्र आता पावसामुळे पाण्याचा रंग पावसामुळे संपूर्णतः लालसर झाला आहे.