

Alandi Municipal Council to conduct hearing on 748 objections regarding quadrennial property tax revision
Sakal
आळंदी : आळंदी नगरपरिषदेमार्फत सध्या शहरातील नागरिकांना सन 2026 ते 2030 यासाठी चतुर्थ वार्षिक करवाढीच्या पाठवलेल्या नोटिसांवर आळंदी शहरातून 748 हरकती प्राप्त झाल्या आहेत. शहरातील मिळकतधारकांकडून आलेल्या हरकतींवर आळंदी नगरपरिषदेत सुनावणी उद्या मंगळवारी (ता. 30) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयामध्ये होणार आहे. ही सुनावणी पुणे नगररचना विभागाचे उपसंचालक, सहाय्यक संचालक, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.