Alandi Waste Crisis: आळंदी घनकचरा डेपोवर वारंवार कचरा जाळला; करोडो खर्च असूनही स्वच्छता व सुरक्षा यंत्रणा ठप्प

आळंदी घनकचरा डेपोवर वारंवार कचरा जाळल्याने धुराचे प्रदूषण वाढले; वर्गीकरण, सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा आणि देखरेखीअभावी स्वच्छ भारत मोहिमेचा फज्जा
Municipal Solid Waste Infractions: Alandi Depo Imposes Systematic Open-Air Incineration

Municipal Solid Waste Infractions: Alandi Depo Imposes Systematic Open-Air Incineration

Sakal

Updated on: 

आळंदी : ओला-सुका कचरा वेगळा केला जात नाही. प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन नाही. नव्याने आणलेला कचरा पुन्हा जळत्या कचऱ्यावरच टाकून कचरा पेटवला जात असल्याचे गंभीर चित्र आळंदी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कचरा डेपोवर दिसून येत आहे. वर्षभरात अनेकदा कचरा पेटल्यामुळे कचरा डेपोवर कचऱ्याची राखच दिसून येते. स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन केवळ कागदावरच रेखाटल्याचे चित्र आहे. पेटलेल्या कचऱ्याला जबाबदार ना ठेकेदार, ना आरोग्य विभाग प्रमुख धरले जात. केवळ करोडो रुपये वर्षाला कचरा व्यवस्थापनासाठी खर्च केले जात असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com