

Former Rivals Unite to Support Unopposed Candidate in Prabhag 8 Alandi
Sakal
आळंदी : निवडणूकमध्ये पैसा प्रतिष्ठा नातेसंबंध कधी जुळतात तर कधी ती पणालाही लावली जातात.स्थानिक स्वरााज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये तर अशा गोष्ठी अधिक जोर धरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आळंदी नगरपरिषद सार्वत्रििक निवडणूकीसाठी प्रभाग दोनमधील खुल्या वर्गासाठी माजी उपनगराध्यक्ष राहिलेले दोन सख्या चुलत भावांमध्ये निवडणूक लागली आहे. तर दुसरीकडे मागील पंचवार्षिक निवडणूकीमध्ये एकमेकांच्या विरोधात टोकाचा प्रचार केला. प्रसंगी मारामारी केली. पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.