Palkhi Procession : आळंदीतील पालखी प्रस्थानाच्या दिवशी फक्त २४० स्थानिक तरुणांना मंदिर प्रवेश दिला जाणार आहे. खांद्यावर पालखी वाहणाऱ्यांनी पांढरे वस्त्र परिधान करणे बंधनकारक आहे.
आळंदी : ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला खांदा देण्यासाठी देऊळवाड्यात येणाऱ्या ग्रामस्थांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. खांदेकऱ्यांसाठीचे पास आळंदीकर ग्रामस्थ सोडून अन्य लोकांना देऊ नयेत.