Alandi Road Development
Alandi Road DevelopmentSakal

Alandi Traffic : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ? आळंदीत चक्क पोलिसांनीच केला रस्ता दुरुस्त

आळंदी येथील हवेली हद्दीतील देहूफाटा चौकातील मुख्य रस्त्यावरच पडलेले खड्डे अखेर वाहतूक पोलिसांनी मुरूम टाकून बुजविले.

आळंदी - येथील हवेली हद्दीतील देहूफाटा चौकातील मुख्य रस्त्यावरच पडलेले खड्डे अखेर वाहतूक पोलिसांनी मुरूम टाकून बुजविले. जे काम पालिकेने करायला हवे, ते आज वाहतूक पोलिसांनी केल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पुणे-आळंदी रस्त्यावर काळे काॅलनीपासून चाकण चौकापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यातच पावसामुळे खड्डे मोठे झाले. पालिका प्रशासन दररोज रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र, खड्ड्याकडे काणाडोळा केल्याने वाहतूक चालकांना खड्यातून गाडी आदळत न्यावी लागते. परिणामी या रस्त्यावर वाहतूक कोंडीही वारंवार होत होती.

येथील देहूफाटा चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीच्या आळंदी-दिघी वाहतूक विभागातील पोलिसांनी अखेर स्वतः पुढाकार घेत रस्त्यांमधील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकला. जेसीबीच्या साहाय्याने मुरूम सपाट करत खड्डे बुजविले.

वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून काम केले. पवार वरिष्ठ अधिकारी असूनही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी सतत स्वतःहून पुढाकार घेत आहेत, असे नागरिकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com