

Pune District
esakal
आळंदी : एकीकडे पोलिसांनी लावलेले निरुपयोगी बॅरिकेट्स, दुसरीकडे दुकानांचे वाढते अतिक्रमण आणि त्यात रस्त्यावरच बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकी, या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत भाविकांना माउलींच्या दर्शनासाठी वाट काढावी लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचणेही आता जिकिरीचे झाले आहे.