PMP Bus : आळंदी यात्रेसाठी बुधवारपासून पुण्यातून ३४२ बस

आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी स्पेशल बससेवा देण्यात येणार आहे.
PMP-BUS
PMP-BUSsakal

पुणे - कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आळंदी यात्रेसाठी ६ ते १२ डिसेंबर दरम्यान मार्गावरील ११३ व जादा २२९ सर्व मिळून ३४२ बसेस देण्यात येणार असल्याचे पीएमपीने जाहीर केले आहे.

यात्रेदरम्यान ८ ते ११ डिसेंबर दरम्यान रात्र बससेवा गरजेनुसार प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येणार असल्याचे पीएमपीने नमूद केले आहे.

यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या जादा बससेवेसाठी रात्री ११ नंतर (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकीट दरापेक्षा रूपये ५ जादा तिकीट दर आकारणी करण्यात येईल. तसेच पीएमपीकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्रा कालावधीत रात्री ११ नंतर नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.

आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी जादा बस या शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून यात्रा स्पेशल बससेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ व मार्ग क्रमांक २५७ आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णतः बंद राहतील. तरी संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल ला सहकार्य करावे असे आवाहन पीएमपीने केले आहे.

या ठिकाणांवरून यात्रेसाठी बससेवा

१- स्वारगेट ते आळंदी, २- हडपसर ते आळंदी, ३- पुणे स्टेशन ते आळंदी, ४- मनपा भवन ते आळंदी, ५- निगडी ते आळंदी, ६- पिंपरी ते आळंदी, ७- चिंचवड ते आळंदी, ८- देहूगांव ते आळंदी, ९- भोसरी ते आळंदी, १० - रहाटणी ते आळंदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com