
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘ड्राय डे’ असतानाही १४ ऑगस्टच्या मध्यरात्री बारानंतरही मद्यविक्री करणाऱ्या आठ पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा, येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक आणि मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका पबवर ही कारवार्इ करण्यात आली.