
Man Dies After Touching DP While Starting Motor
Sakal
राजेंश कणसे
आळेफाटा : बोरी खुर्द या ठिकाणी एका ४५ वर्षीय तरूणाचा विजेचा धक्का लागुन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरी खुर्द येथील सुभाष विष्णु शिंदे (वय ४५) हे गुरुवारी सकाळी ७ वाजून ४५ वाजण्याच्या सुमारास मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी असलेल्या डीपीला हात लावल्यानंतर त्यांना करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.