alephata
alephatasakal

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

शेतक-यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन रेल्वे जाण्याला पूर्णपणे विरोध दर्शविला आहे

आळेफाटा : रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी यांना आज निवेदन देऊन रेल्वेला पूर्णपणे विरोध दर्शविला आहे. काल आळेफाटा (ता.जुन्नर)या ठिकाणी रेल्वे विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन केले होते. उपविभागीय अधिकारी सारंग कोडीलकर यांनी आळेफाटा (alephata) या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ दिली होती, परंतु काही कारणास्तव आळेफाटा या ठिकाणी चर्चेसाठी न येता मोजक्याच शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जुन्नर (junnar) या ठिकाणी बोलवण्यात आले होते. त्यानुसार आज तहसीलदार कार्यालयात रेल्वे विरोधी कृती समीतीचे जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन रेल्वे जाण्याला पूर्णपणे विरोध दर्शविला आहे. (alephata farmers Statement the state authorities regarding)

यावेळी तहसिलदार हनुमंत कोळेकर तसेच भटकळवाडी, पिंपळवडी, कादळीव हिवरे तर्फे नारायणगाव कृती समिती मोजके पदाधिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अंबादास हांडे तसेच महारेलचे जयंत पिंपळगावकर, उपमहाव्यवस्थापक सिध्दलिंग शिरोळे उपस्थित होते.

alephata
पोलिस वेशातील चोरटयांनी १ कोटी १२ लाख लांबविले

याबाबत बोलताना रेल्वे विरोधी कृती समितीचे निलेश भुजबळ म्हणाले, हिरवे येथे मोजणीचे काम बंद केल्यानंतर १०० ते १५० शेतकरी बांधव उपस्थित होतो. त्यानंतर प्रांतधिकाऱ्यांना रेल्वे कृती समितीच्या वतीने निवदेन देण्यात आले. त्यात नमूद केल्यानुसार आमच्या बागायती जमिनीतून कुठल्याही परिस्थितीतून रेल्वे जाऊन दिली जाणार नाही. त्यामुळे आमचा रेल्वेस विरोध आहे. जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर सर्व बाधित शेतकऱ्यांसमोर चर्चा करावी लागेल, असे म्हटले.

alephata
पुण्यातील 'त्या' बाप -लेकासह पाच जणांवर मोका

प्रांताधिकारी सारंग कोडेकर यांनी सांगितले, पुणे - नाशिक हायस्पिड रेल्वे जुन्नर तालुक्यातील ज्या गावांमधून जात आहे त्या गावांमधील शेतक-यांनी यासाठी विरोध दर्शविला आहे, असे आज निवेदन या रेल्वे कृती समीतीने दिले असुन तालुक्याचे लोकप्रतिनिधी खासदार,आमदार तसेच ज्या शेतक-यांची जमीन गेली आहे ते शेतकरी व रेल्वे अधिकारी यांची लवकरच बैठक बोलविण्यात येणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com