पोलिस वेशातील चोरटयांनी १ कोटी १२ लाख लांबविले

पुणे सोलापुर महामार्गावर पाटस येथे रात्री पोलिस वेशात आलेल्या चार चोरटयांनी सिनेस्टाइलने एका एसटीला थांबुन चार प्रवाशांकडील तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम लुटुन पोबारा केला.
file photo
file photosakal

पाटस : पुणे सोलापुर महामार्गावर पाटस येथे रात्री पोलिस वेशात (Thieves in police uniform) आलेल्या चार चोरटयांनी सिनेस्टाइलने एका एसटीला थांबुन चार प्रवाशांकडील तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांची ( 1 crore 12 lakh) रक्कम लुटुन पोबारा केला. या प्रकाराने पोलिसांच्या चांगल्याच भुवया उचावल्या गेल्या आहेत. मंगळवारी (ता.३) मध्यरात्री सव्वा एक वाजता येथील ढमाले वस्ती भागात ही धक्कादायक घटना घडली. हितेंद्र जाधव, तजेस बोबडे, विकास बोबडे, संतोष बोबडे चौघेही रा.वाघोशी ता.फलटण जि.सातारा अशी संबधीत प्रवाशांची नावे आहेत. (Thieves in police uniform disburse Rs 1 crore 12 lakh)

याबाबत प्रवाशी हितेंद्र बाळासाहेब जाधव रा.वाघोशी ता.फलटन जि.सातारा यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहीती दिली. संबधीत वरील फिर्यादी हितेंद्र व त्यांचे तीन प्रवाशी साथीदार हे चौघे तब्बल एक कोटी १२ लाख रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बॅगेमध्ये घेवुन भिंवडीला जाण्यासाठी निघाले. ते सोलापुर येथुन तेलंग- भिवंडी या एसटी मध्ये बसले.

पुणे सोलापुर महामार्गाने मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता एसटी दौंड तालुक्यातील पाटस हद्दीतील ढमालेवस्ती भागात आली. त्यावेळी पोलिस वेशात असणाऱया चार जणांनी मोठया थाटात हातवारे करीत एसटी थांबविली. एसटीत प्रवेश करीत सदर फिर्यादी व त्यांच्या प्रवाशी साथीदारांना तुम्ही दोन नंबरचा धंदा करीत आहेत. खाली उतरा अशी दमदाटी करीत खाली उतरविले. एसटी जाताच प्रवाशांना काठीने मारहाण व दमबाजी करीत त्यांच्याकडील पैसे असलेल्या बॅगा ताब्यात घेतल्या.त्यानंतर आरोपींनी दोन दुचाकीवरुन शिताफिने पोबारा केला.

file photo
आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी

हे तोतया पोलिस असल्याचे लक्षात येताच संबधीत प्रवाशांनी यवत पोलिस ठाण्यात धाव घेवुन सर्व प्रकार सांगितला. माहीती मिळताच पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आदींनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल घस,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासासाठी पोलिस पथके तैनात करुन ती

विविध दिशेला रवाना करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. प्रवाशांनी दिलेल्या फिर्यादी नुसार यवत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयां विरुध्द गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com