

Alephata Residents Complain of Illegal Waste Dumping
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बायपास जवळ रस्त्याच्याकडेला बेजवाबदार नागरिक मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यासह घनकचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून महामार्गावर सर्वत्र दरुगधी, घाणीचे साम्राज्य आणि अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीतून बहुतांश वाहनचालकांना नाकाला हात लावूनच या ठिकाणाहुन जावे लागत आहे.