सावधान...! बिबट्या शहराच्या वेशीवर

Leopard
Leopard

जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्‍यांसह जिल्ह्याच्या इतर भागांतही बिबट्याचा वावर वाढला आहे. बारामती, इंदापूर, दौंड या दुष्काळी पट्ट्यातही बिबट्या आढळू लागला आहे. मनुष्यवस्ती व जंगल यांच्या सीमारेषेवर बऱ्याचदा बिबट्याचा अधिवास असतो. मात्र, पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांच्या वेशीपर्यंत बिबट्याची धाव पोचली आहे.

पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्याचे पाच ते दहा किलोमीटरच्या परिसरात स्वतःचे स्वतंत्र कार्यक्षेत्र असते. मात्र, बिबट्यांची संख्या वाढल्यावर त्यांचे कार्यक्षेत्रही विस्तारू शकते. मानवाने अमर्याद जंगलतोड करून बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केले आहे. विकासाच्या नावाखाली जंगलावर अतिक्रमण केले जात आहे. जंगल परिसरात माणसांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बिबट्या गर्दीपासून दूर जाण्याऐवजी आणखी जवळ येऊ लागला आहे. एकेकाळी जुन्नर तालुक्‍यातील ऊसशेतीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या कार्यक्षेत्राचा परीघही विस्तारत आहे. ऊसशेतीच्या क्षेत्रात बिबट्याला सुयोग्य वातावरण व पाळीव प्राण्यांचे खाद्य मिळते. त्यामुळे त्याचे आयुष्यमान वाढले आहे. त्यांच्या नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

लोकसंख्या वाढल्यावर माणसांनी जसे कमी जागेतही परिस्थितीशी जुळवून घेतले, तसेच बिबट्याही परिस्थितीशी जुळवून घेतो. मात्र, संख्या वाढल्यास गर्दी होते. त्यामळे संघर्ष होतो. अशावेळी बिबटे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करतात.
- डॉ. अजय देशमुख, पशुवैद्यकीय अधिकारी, बिबट निवारा केंद्र, माणिकडोह

बिबट्याचा जीवनकाल

  • बिबट्याच्या मादीचा गर्भधारणेचा काळ ९० ते १०५ दिवस. 
  • बिबट्या मादीकडून एका वेळेला १ ते ४ पिलांना जन्म.
  • बिबट्याचा बछडा तीन महिन्यांतच बाहेरचे अन्न (मांस) खातो.
  • बछडे मोठे होऊन स्वावलंबी झाल्यानंतर आईपासून होतात वेगळे.
  • साधारणपणे बिबट्याचा जीवनकाल पंधरा ते सतरा वर्षांचा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com