
पुणे - न्यायालयाच्या आदेशानंतरही पत्नी व मुलीला पोटगी न देता त्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पतीच्या निवृत्ती वेतनातून थकीत पोटगीची रक्कम वसुल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर पत्नीला थकीत पोटगी मिळणार आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निकाल दिला.