esakal | Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगर मतदारसंघात सर्व उमेदवार सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

all candidates are secure In Shivaji Nagar constituency for maharashtra Vidhan Sabha 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीमध्ये अर्ज व्यवस्थित व बिनचूक भरल्याने सर्व 13 उमेदवार निवडणूक लढण्याठी पात्र ठरले आहेत. सोमवारी (ता. 7) अर्ज माघारीचा दिवस असून, त्यानंतर शिवाजीनगरमधील अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगर मतदारसंघात सर्व उमेदवार सुरक्षित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीमध्ये अर्ज व्यवस्थित व बिनचूक भरल्याने सर्व 13 उमेदवार निवडणूक लढण्याठी पात्र ठरले आहेत. सोमवारी (ता. 7) अर्ज माघारीचा दिवस असून, त्यानंतर शिवाजीनगरमधील अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतीक भवन येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता अर्जांची छाननीस सुरूवात झाली. त्यावेळी उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Vidhan Sabha 2019 : पर्वती मतदारसंघात पंधरा जणांचे अर्ज मंजूर तर, एक नामंजूर  

शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट, मनसेचे सुहास निम्हण, आपचे मुकुंद किर्दत, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप कुऱ्हाडे यांच्यासह 13 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत.

Vidhan Sabha 2019 : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचाच अर्ज बाद
छाननीमध्ये उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले, तसेच प्रत्येकाचा अर्ज व्यवस्थित तपासण्यात आला. त्यामध्ये कोणीही हरकत न घेतल्याने सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी अस्मिता मोरे यांनी यांनी अर्जाची छाननी केली.