पुणे विद्यापीठाबरोबरच सर्व महाविद्यालयांचे शुल्क होणार कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे विद्यापीठाबरोबरच सर्व महाविद्यालयांचे शुल्क होणार कमी

पुणे - कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका विद्यार्थी, (Student) पालकांना (Parents) बसला असून याचा विचार करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शुल्क कपातीचा (Fee Reduction) निर्णय (Decision) घेतला आहे. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे (Student) संपूर्ण शुल्क (१०० टक्के) माफ करण्यात येणार असल्याचेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा, शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने  शुल्क कपातीची शिफारस करणारा अहवाल विद्यापीठ प्रशासनासमोर सादर केला. हा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्वीकारला असून त्यातील शिफारशींना मान्यता दिली असून त्यानुसार शुल्क कपात होणार आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत, त्यांना शुल्कामध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. शुल्कामध्ये केलेली कपात ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे.

हेही वाचा: पुणे : पोलिसांमुळे घराचा आधार गेला; सुरेश पिंगळे यांच्या पत्नीचा आक्रोश

शुल्क कपातीबाबत असे असतील निर्णय -

- कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात १०० टक्के सवलत

- गरजू विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज केल्यानंतर हप्त्यांत शुल्क भरण्याची मिळणार मुभा

- विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आल्यानंतर वसतिगृह/निवास शुल्क लागू होईल.

अशी होणार शुल्कात कपात :

 • शुल्काचा तपशील : शुल्क कपात टक्केवारीत

 • ग्रंथालय शुल्क : ५० टक्के

 • प्रयोगशाळा शुल्क : ५० टक्के

 • जिमखाना शुल्क : ५० टक्के

 • विद्यार्थी कल्याण निधी : ७५ टक्के

 • अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम : ५० टक्के

 • परीक्षा शुल्क :२५ टक्के

 • औद्योगिक भेटी : १०० टक्के

 • महाविद्यालय मासिक : १०० टक्के

 • विकास निधी: २५ टक्के

 • कॉशन मनी डिपॉझिट : १०० टक्के

 • इतर ठेवी : १०० टक्के

 • आरोग्य तपासणी शुल्क : १०० टक्के

 • आपत्ती व्यवस्थापन शुल्क : १०० टक्के

 • अश्वमेध : १०० टक्के,

 • संगणक सुविधा : ५० टक्के

‘विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालयांसाठी शुल्क कपातीचा घेतलेला निर्णय लागू असणार आहे. कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि विविध महाविद्यालयांकडून माहिती मागविण्यात आली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना हप्त्याने शुल्क देण्याची सुविधा मिळावी, यासाठी संबंधित महाविद्यालयात अर्ज पडताळणी (स्क्रुटनी) समिती कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे. या समितीद्वारे अर्जाची पडताळणी करून गरजू विद्यार्थ्यांना हप्त्याने शुल्क भरण्याची सवलत दिली जाईल.’

- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: All Colleges Along With Pune University Lower Fees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..