मंचर - 'उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे झालेल्या ढगफुटीमुळे मोठी हानी झाली आहे. मंचर जवळील अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सन १९९० च्या दहावी बॅचचे २४ यात्रेकरू गंगोत्री परिसरात अडकले आहेत..ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने गेले २४ तास उलटूनही त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. पण सर्व यात्रेकरू सुरक्षित आहे. अशी माहिती उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापनाकडून उपलब्ध झाली आहे.' असे ट्वीट द्वारे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कळविले आहे..'उत्तराखंडचे मुख्यमंत्री अॅड. पुष्कर सिंह धामी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ मदतीसाठी विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन व बचाव यंत्रणांशी सातत्याने संपर्कात राहून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका होईपर्यंत मी व माझे सहकारी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहोत.' असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले..उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, गंगोत्री येथील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत. मात्र संपर्क तुटल्याने अवसरी खुर्दमध्ये त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क होत नाही. दरम्यान २४ माजी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार व अवसरी खुर्द ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.मंचर येथे प्रांत गोविंद शिंदे व आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतत उत्तराखंड प्रशासनाशी संपर्कात आहेत. 'ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क झाला असून त्यांच्या वेळापत्रकानुसार अवसरी खुर्दचे यात्रेकरू गंगोत्री मध्ये आहेत..गंगोत्रीमध्ये कुठलीही आपत्ती झालेली नाही. पण मोबाईल टॉवर नसल्याने व वीजपुरवठा खंडित झाल्याने संपर्क होत नाही. आम्ही सतत संपर्कात आहोत.' असे प्रांत गोविंद शिंदे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले..महाप्रलय घटना उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली या ठिकाणी घडली आहे. अवसरी खुर्द येथील यात्रेकरू गंगोत्री येथे असल्याची माहिती मिळाली असून, उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार गंगोत्री येथील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.