तृतीयपंथीयांच्या मतदान हक्कासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार - राजीव कुमार

स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यापासून ते तृतीयपंथीयांबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी तुम्ही अविरत कार्य करत आहात.
Rajiv Kumar Chief Election Commissioner
Rajiv Kumar Chief Election Commissionersakal
Summary

स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यापासून ते तृतीयपंथीयांबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी तुम्ही अविरत कार्य करत आहात.

पुणे - स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यापासून ते तृतीयपंथीयांबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी तुम्ही अविरत कार्य करत आहात. कायद्यातील बदल, आरक्षण आणि नोकरीसंबंधीचे विषय आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. परंतु, सर्व तृतीयपंथीयांना निवडणूक ओळखपत्र मिळवून देणे ही आमची जबाबदारी असून, त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय, अशी ग्वाही देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशपातळीवर सुरू झालेल्या मतदान नोंदणी कार्यक्रम अर्थात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण २०२३चे उद्घाटन त्यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्य निवडणूक आयोगाने तृतीयपंथी आणि फिरस्ते नागरिकांच्या प्रतिनीधीमंडळाशी चर्चा केली. त्यावेळी उत्तरादाखल वक्तव्यात त्यांनी ही ग्वाही दिली. मतदार यादीतील दुबार नोंदणी तपासणे आणि नवीन मतदारांची नोंदणी करून घेणे, असा अभियानाचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो आणि बहु-माध्यम माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, निवडणूक आयोगाच्या माध्यम महासंचालक शेफाली शरण, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.

देशपांडेच्यां अध्यक्षतेखाली समिती -

तृतीयपंथांना स्वतःची ओळख पटवून देणारे कोणतेही कागदपत्रे किंवा ओळखपत्र अद्याप नाही. त्याची निवडणूक आयोगाने गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे तृतीयपंथांना ओळखपत्रे कशा पद्धतीने देता येतील याबाबत महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे प्रमुख श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जन्माचा दाखला, प्रतिज्ञापत्र, तसेच मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती काम करेल.संवेदनशील असलेल्या दुर्गम भागातील ७५ गट, बेघर, तसेच अन्य प्रकारच्या घटकांना देखील मतदान प्रक्रियेत समावेश करण्याचा प्रयत्न आहे, याकडे राजीवकुमार यांनी लक्ष वेधले.

शुक्रवार पर्यंत प्रदर्शन

विद्यापीठाच्या मार्बल हॉलमध्ये शुक्रवार (ता.११) पर्यंत प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनातून मतदार नावनोंदणी, ऑनलाइन नावनोंदणी, मतदान पत्रक, डिजिटल मतदान पत्रक, मतदान अधिकार याबद्दल चित्रांच्या माध्यमातून आकर्षक अशी माहिती देण्यात आली आहे. आभासी मतदान केंद्र, भारतीय निवडणुकीवर आधारित फ्लिप-बुक निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांवर आधारित स्वतंत्र विभाग, मतदार नोंदणीचे बॅकलिट्स, लोकशाहीची भिंत, जनजागृतीपर गाणी या सर्वांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com