alka parhyad and sushma parhyad
sakal
शिक्रापूर - केंदूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका सुदाम पऱ्हाड यांची, तर उपसरपंचपदी सुषमा अशोक पऱ्हाड यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या पाच वर्षात येथील ग्रामपंचायतीतील सर्व १७ सदस्यांना सरपंच वा उपसरपंचपदावर काम करण्याची संधी मिळाली असून, अशी संधी देणारे शिरूर तालुक्यातील हे एकमेव गाव ठरले.