मराठा आरक्षण : खडकवासला मतदारसंघात सर्वपक्षीय निषेध 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं', आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत रविवारी सकाळी अकरा वाजता आंदोलन केले.

धायरी : मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे खडकवासला मतदारसंघातर्फे निषेध मोर्चा रविवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता वडगाव पुलाखाली (वीर बाजी पासलकर उड्डाणपूल) करण्यात आले.

'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', 'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं', आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत रविवारी सकाळी अकरा वाजता आंदोलन केले. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मराठा तरुणांना नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळाले पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू भक्कमपणे मांडावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत आंदोलन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकरी कामगार पक्षाचे राहुल पोकळे, उपजिल्हा अध्यक्ष महादेव मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आनंद मते, चंद्रशेखर दादा पोकळे, मनसेचे खडकवासला अध्यक्ष चंद्रकांत गोगावले, विजय मते, चंदन कड, कालीदास चावट, विकास शिंदे, अनिल हगवणे, दीपक मते, वीरेंद्र सैदाने, अतुल मते, सरपंच सौरभ मते, बापू हगवणे, अदित्य मते यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, वडगाव, धायरी, नऱ्हे, वारजे, बहुली, सांगरूण, कुडजे, खानापूर, डोणजे, पानशेत पंचक्रोशीतील मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. अतुल पवार, नरेंद्र हगवणे, नितीन हगवणे, लक्ष्मण हगवणे, बाळासाहेब पायगुडे, सुनील कोरपडे, राहुल वाळुंजकर, गोकुळ करंजावणे, कालिदास चावट हे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all party protest in khadakwasla constituency regarding maratha reservation