पुण्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी चारही धरणात जमा

पुण्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी चारही धरणात जमा

खडकवासला : मागील आठवड्यात राज्यभरात जोरदार पाऊस झाला. कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात याने थैमान घातले आहे. मग आपल्या खडकवासला धरण साखळीत देखील पाऊस झाला. खडकवासला धरणातून पाणी सोडले जात आहे. आज दिवस अखेर किती पाणीसाठा जमा झाला आहे. आणि तो किती दिवस पुरेल, असा प्रश्न पडला असेल, त्याचे उत्तर असे आहे, बुधवारी सकाळी या चारही दरात मिळून २४.२५ टीएमसी म्हणजे ८३.२१ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहर आणि परिसराला पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा किंवा शेतीसाठी वर्षभर पुरेल एवढा जमा झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसराला वर्षभर पिण्यासाठी २१ टीएमसी पाण्याची गरज असते. आणि शेतीचा विचार केला तर शेतीसाठी कालव्यातून खरीप एक, रब्बीचे दोन व उन्हाळी दोन अशी पाच आवर्तन सोडावी लागतात. किमान एक आवर्तन चार टीएमसी एवढा असते. म्हणजे सध्या जमा झालेला २४.२५ टीएमसी पाणीसाठा पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वर्षभर पुरेल एवढा जमा झालेला आहे.

पुण्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी चारही धरणात जमा
पुणे : अडीचशे खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती

दरम्यान, गुरुवारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे ३.१५ टीएमसी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे. बुधवारी खडकवासला धरणातून तीन हजार ४२४ क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे सहा, पानशेत ३४, वरसगाव येथे ३८ तर टेमघरला ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील १५ दिवसापासून धरणातून सुमारे एक हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.

आज जमा झालेले हा पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा १४.४१ टीएमसीने जास्त आहे. पानशेत धरणात आज बुधवारी सकाळी सहा वाजता ८९.९४ टक्के तर सात वाजता ९० टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. आजपासून पानशेत धरणात किती पाऊस होतोय, त्यानुसार किती पाणी जमा होतय. यावर पानशेत धरणातील विसर्ग ठरणार आहे. त्यामुळे, पानशेत मधील पावसावर खडकवासला पाटबंधारे विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. पानशेत मधील विसर्ग खडकवासला धरणात जमा होतो. त्यामुळे खडकवासला धरणातील देखील विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी चारही धरणात जमा
‘अ’ ऑनलाइनचा : दूरस्थ अध्यापन पद्धती

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / १.९७ / १००

पानशेत- १०.६५ / ९.५७ / ८९.८४

वरसगाव- १२.८२ / १०.२० / ७९.५७

टेमघर- ३.७१ / २.५१ / ६७.८१

चार धरणात एकूण पाणीसाठा एकूण- २९.१५ / २४.२५ / ८३.२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com