

DGCA to Inspect Unregulated Airstrips Nationwide
Sakal
पुणे: बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत हवाई वाहतूक मंत्रालय व नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ‘डीजीसीए’ने देशातील सर्व अनियंत्रित धावपट्टीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तपासणी संबंधित राज्यासोबत एकत्रितपणे केली जाणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या १५ धावपट्टींचा समावेश आहे. देशात सुमारे ४०० धावपट्टी या अनियंत्रित आहेत.