सर्व विद्यापीठांनी एकमेकांशी समन्वय साधावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्‌घाटन व हस्तांतरण कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

सर्व विद्यापीठांनी एकमेकांशी समन्वय साधावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे - ‘तंत्रशिक्षणात वेगाने प्रगती होत असून या क्षेत्रातील ज्ञानाकडे बारकाईने लक्ष न दिल्यास जगात आपण मागे पडू. त्यामुळे विद्यापीठांनी एकमेकांशी समन्वय साधत तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे,’ असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्‌घाटन व हस्तांतरण कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (लोणेरे) कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान जोगी, कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ.विवेक वडके आदी मान्यवर उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, ‘तंत्रशास्त्र किंवा आरोग्य यांसारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून इतर विद्यापीठांशी जोडलेल्या शैक्षणिक संस्थांना लाभ होणार आहे.’

डॉ. काळे म्हणाले, ‘तंत्रशास्त्र विद्यापीठाची नागपूर, औरंगाबाद येथे प्रादेशिक कार्यालय सुरू असून आज पुण्यातही त्याची सुरवात झाली. लवकरच मुंबईमध्येही उपकेंद्र सुरू केले जाईल. पुणे विद्यापीठाने सात हजार ५०० चौरस फुटाचे कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडे यांनी केले. तर डॉ. जोगी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: All Universities Should Coordinate With Each Other Governor Bhagat Singh Koshyari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..